मुंबई: लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची माहिती एबीपी माझा सुत्रांनी दिली आहे.
Contents
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेसाठी पाठवलेली नावे:
- पंकजा मुंडे
- अमित गोरखे
- परिणय फुके
- सुधाकर कोहळे
- योगेश टिळेकर
- निलय नाईक
- हर्षवर्धन पाटील
- रावसाहेब दानवे
- चित्रा वाघ
- माधवी नाईक
विधानपरिषद निवडणुकीचं गणित:
जुलैमध्ये राज्यात 11 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत विधान परिषद निवडणुकीवरुन जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 11 जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचे सूचक वक्तव्यही केले आहे.
संख्याबळाचे गणित:
महायुती:
- भाजप: 103
- शिंदे सेना: 37
- राष्ट्रवादी (AP): 39
- छोटे पक्ष: 9
- अपक्ष: 13
- एकूण: 201
महाविकास आघाडी:
- काँग्रेस: 37
- ठाकरे गट: 15
- राष्ट्रवादी (SP): 13
- शेकाप: 1
- अपक्ष: 1
- एकूण: 67
तटस्थ:
- एमआयएम: 2
- सपा: 2
- माकप: 1
- क्रां. शे. प.: 1
- एकूण: 6