नाशिकमध्ये आज सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले. 63 केंद्रे आणि 90 बूथवर मतदान होणार आहे. 69 हजार शिक्षक मतदार आपला आमदार ठरवणार आहेत. नाशिकमध्ये संदीप गुळवे (ठाकरे गट), किशोर दराडे (शिंदे गट), ऍड. महेंद्र भावसार (अजित पवार गट), आणि विवेक कोल्हे (अपक्ष) यांच्यात लढत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात होणारी ही पहिली मोठी निवडणूक आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान सुरू झाले आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक मतदार संघ आणि दोन पदवीधर मतदार संघ आहेत. मुंबई, कोकण पदवीधर मतदार संघ, तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक पार पडत आहे. आज सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले असून, 1 जुलैला मतमोजणी होईल. त्यावेळी महायुती की महाविकास आघाडी यापैकी कोणाची सरशी होते, हे स्पष्ट होईल.
नाशिकमध्ये मतदानाची सुरुवात
नाशिकमध्ये सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले. 63 केंद्रे आणि 90 बूथवर मतदान होत आहे. 69 हजार शिक्षक मतदार आपला आमदार ठरवणार आहेत. नाशिकमध्ये संदीप गुळवे (ठाकरे गट), किशोर दराडे (शिंदे गट), ऍड. महेंद्र भावसार (अजित पवार गट), आणि विवेक कोल्हे (अपक्ष) यांच्यात लढत होत आहे. नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी सकाळी घरातील देवांचे दर्शन घेतले आणि कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले.
कोकण पदवीधर मतदार संघातील लढत
विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदान सुरू झाले आहे. कोकण विभागात एकूण 2 लाख 23 हजार 225 मतदार आहेत. यात सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत, ज्यांची संख्या 98 हजार 860 इतकी आहे. यात 42 हजार 478 स्त्री मतदार, 56 हजार 371 पुरुष मतदार, आणि 11 तृतीयपंथी मतदार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण 124 मतदान केंद्रे आहेत. या ठिकाणी एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत. परंतु मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. भाजपकडून 2 वेळा आमदार झालेले निरंजन डावखरे यांच्या समोर काँग्रेसचे रमेश किण हे उमेदवार आहेत.