By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Maharashtra ElectionMaharashtra ElectionMaharashtra Election
  • Home
  • Election News
  • Election Results
  • Top Categories
    • Election Analysis
    • Election Laws
    • Voter Information
    • Events
    • Political Parties
    • Opinion Polls
  • Others
    • Candidates
    • Editorials
    • Fact-Checking
    • Historical Data
    • Multimedia
    • Social Media Updates
  • Contact
Search
  • Advertise
© 2024 Maharashtra Election 2024. All Rights Reserved. Social Wits.
Reading: लोकसभेतील पराभव झटकून वंचित पुन्हा नव्या जोमाने अ‍ॅक्शन मोडमध्ये! 288 विधानसभा मतदारसंघात स्वबळाच्या दृष्टीने चाचपणी
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
Maharashtra ElectionMaharashtra Election
Font ResizerAa
  • Election News
  • Opinion Polls
  • Voter Information
  • Election Results
  • Election Analysis
  • Candidates
Search
  • Home
  • Election News
  • Election Results
  • Top Categories
    • Election Analysis
    • Election Laws
    • Voter Information
    • Events
    • Political Parties
    • Opinion Polls
  • Others
    • Candidates
    • Editorials
    • Fact-Checking
    • Historical Data
    • Multimedia
    • Social Media Updates
  • Contact
Have an existing account? Sign In
  • Advertise
© 2024 Maharashtra Election 2024. All Rights Reserved. Social Wits.
Maharashtra Election > Blog > Election News > लोकसभेतील पराभव झटकून वंचित पुन्हा नव्या जोमाने अ‍ॅक्शन मोडमध्ये! 288 विधानसभा मतदारसंघात स्वबळाच्या दृष्टीने चाचपणी
Election News

लोकसभेतील पराभव झटकून वंचित पुन्हा नव्या जोमाने अ‍ॅक्शन मोडमध्ये! 288 विधानसभा मतदारसंघात स्वबळाच्या दृष्टीने चाचपणी

Election News
Last updated: June 27, 2024 1:27 pm
Election News
Share
2 Min Read
Lok Sabha Election 2024 Polls Phase 2 - Maharashtra Election
SHARE

राज्यात लोकसभेतील (Lok Sabha Elections 2024) दारूण पराभव झटकून वंचित (Vanchit Bahujan Aghadi) पुन्हा नव्या जोमाने अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या स्वबळाच्या दृष्टीने चाचपणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय (Maharashtra Assembly Election 2024) इच्छुकांकडून पक्षाने अर्ज मागवले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात वंचितने निरीक्षकांची नेमणूक केली आहे.

आज राज्यातील सर्व मतदारसंघातील इच्छुकांची माहिती पक्षाकडे दिली जाणार आहे. परिणामी, वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) राज्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकला चलो रे ची तयारी असल्याचे दिसून आले आहे. प्रकाश आंबेडकर गेल्या 15 दिवसांपासून कुटुंबियांसह सुट्टीसाठी महाराष्ट्राबाहेर गेल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ते राज्यात परत आल्यावर विधानसभानिहाय आढावा घेणार असून त्यावरून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

पराभव झटकून वंचित पुन्हा नव्या जोमाने अ‍ॅक्शन मोडवर
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितने लढवलेल्या 38 जागांवर पक्षाला 16 लाखांच्या आत मते मिळाली आहेत. 2019 च्या तुलनेत पक्षाचा जनाधार घसरला असल्याचेही यातून दिसून आले आहे. पक्षाचे हक्काचे मतदार असलेले दलित, ओबीसी, मायक्रो मायनॉरिटी आणि मुस्लिम मतदार मविआकडे गेल्याने वंचितला मोठा फटका बसल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे वंचितला मविआजवळ करण्याची शक्यता आता धुसर असल्याचे चित्र आहे. म्हणूनच वंचितने आतापासूनच डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच गमावलेला जनाधार परत मिळवण्यासाठी वंचितने आतापासून चाचपणी सुरू केली आहे.

वंचित पुन्हा एकदा महायुती, महाविकास आघाडीचे तणाव वाढविणार?
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागल्याचे दिसले. या पराभवाची कारणे आणि त्यावरील विचार केल्यानंतर वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार असल्याचा विश्वास दर्शवला. तसेच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचून न जाता पूर्ण ताकदीनं विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी, त्या अनुषंगाने वंचित कामाला लागल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीचे तणाव वाढविणार असल्याची स्थिती आहे. कारण आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने त्यासाठी वंचितने राज्यभरात हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी आणि मुलाखती वंचित घेत आहे. दरम्यान, अमरावतीतील विधानसभेसह राज्यातील संपूर्ण विधानसभा वंचित पूर्ण ताकदिने लढवणार असल्याची माहिती वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली आहे.

Share This Article
Facebook X Whatsapp Whatsapp
Share
Previous Article BJP Rally - Maharashtra Election Unease in Mahayuti? NCP Leader Hints at Separate Contesting in Maharashtra Assembly Elections
Next Article uddhav thackeray 1 - Maharashtra Election Uddhav Thackeray on Opposition’s Maharashtra Chief Minister Face
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

1kFollowersLike

Latest News

Air India Boeing 787 crash near Ahmedabad with 242 onboard, massive fireball and rescue operations visible at crash site
Air India Boeing 787 crash After Takeoff from Ahmedabad, 242 Onboard
Blog June 12, 2025
Paradigm Techsolutions receiving Service Provider Team of the Year award at Surakshit Mumbai Awards 2025
Surakshit Mumbai Awards 2025 Proudly Honoured Paradigm TechSolutions as “Best Service Provider Team of the Year”
Blog June 11, 2025
Cash found in Dhule rest house sparks bribery probe
Dhule Bribery Allegation: ₹5.5 Crore Found, Fadnavis Orders SIT Probe
Blog May 23, 2025
Maharashtra CM Devendra Fadnavis flags off the trial run of Mumbai Metro Line 9, connecting Kashigaon to Dahisar East
Mumbai Metro Line 9: Chief Minister Devendra Fadnavis flagged off the trial run
Blog May 23, 2025

Stay updated on the Maharashtra State Election 2024 with our dedicated news portal. Get the latest news, opinions, and analysis on the election, candidates, and parties.

Top Categories

  • Election Analysis
  • Election Laws
  • Election News
  • Election Results
  • Opinion Polls
  • Political Parties

Other Categories

  • Candidates
  • Events
  • Fact-Checking
  • Historical Data
  • Multimedia
  • Voter Information

Follow US On Facebook

Get our newest articles instantly!

© 2024 Maharashtra Election 2024. All Rights Reserved. Social Wits.
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?